बीएसएनएल कर्मचार्‍यांचा संप मागे

April 20, 2010 11:07 AM0 commentsViews: 1

20 एप्रिलबीएसएनएलच्या अडीच लाख कर्मचार्‍यांनी अखेर संप मागे घेतला आहे. या कर्मचार्‍यांसोबत 50 हजार अधिकारीही आजपासून संपावर गेले होते. स्वेच्छानिवृत्ती आणि निर्गुंतवणुकीविरोधात त्यांनी हा संप केला होता. स्वेच्छानिवृत्ती आणि 30 टक्के निर्गुंतवणुकीची शिफारस पित्रोदा समितीने केली आहे. त्याला कर्मचार्‍यांचा विरोध आहे. त्याचबरोबर खाजगी कंपन्यांना बीएसएनलाचे टॉवर्स वापरायला देण्यास कर्मचार्‍यांचा विरोध आहे. तसेच भारतीय दूरसंचार सेवेतील गेल्या 10 वर्षांपासून डेप्युटेशनवर काम करणार्‍या 1500 कर्मचार्‍यांना सेवेत सामावून घ्यावी, अशी त्यांची मागणी आहे. त्यांच्या या मागणीवर विचार करण्याचे आश्वासन व्यवस्थापनाने दिले आहे.

close