आरबीआयचे नवे धोरण जाहीर

April 20, 2010 11:16 AM0 commentsViews: 5

20 एप्रिलआरबीआयचे नवीन क्रेडिट पॉलिसी जाहीर झाली आहे. यामध्ये बँकांना आरबीआयकडून होणारा कर्जपुरवठा महाग झाला आहे. रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट यांच्यामध्ये 0.25 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता बँकांना रिझर्व्ह बँकेकडून 5 ऐवजी 5.25 टक्के टक्क्यांनी कर्ज मिळेल. तर आरबीआय आता बँकांकडून साडेतीन ऐवजी पावणेचार टक्क्यांनी पैसे परत घेईल.सोबतच आता बँकांना जास्त पैसा आरबीआयसोबत ठेवावा लागणार आहे. रिझर्व्ह बँकेने सीआरआर 6 टक्के केला आहे. यामुळे तब्बल 12 हजार 500 कोटी रुपये अर्थव्यवस्थेतून काढून घेतले जातील. यासोबतच या वर्षात अर्थव्यवस्था 8 टक्के दराने प्रगती करेल, असाही अंदाज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे गृहकर्जांवर ताबडतोब कोणताही परिणाम होणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

close