नांदेडमध्ये पावसाचे धूमशान, विष्णूपुरी धरणं ओव्हरफ्लो

September 25, 2016 1:10 PM0 commentsViews:

 nanded
नांदेड, 25 सप्टेंबर : गेल्या पाच दिवसापासून नांदेड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय. या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातलं चित्र बदलवून टाकलंय. जिल्ह्यातील धरण , तलाव ओव्हरफ्लो झालेत, तर नदी नाले ओसंडून वाहत आहेत.

नांदेडमध्ये गेल्या 24 तासात 50 मिली मीटर पावसाची नोंद झाली. आतापर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 96 % पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे लोहा तालुक्यातील लिंबोटी धरण 100 टक्के भरलंय. धऱणाचे 6 दरवाजे 50 सेंटी मीटरपर्यंत उघडण्यात आले आहेत. तर विष्णुपुरी धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. धरणात पाण्याचा ओघ सुरूच असल्याने 6 वा दरवाजाहीउघडण्याची शक्यता आहे. पावसामुळे गोदावरी नदीने रौद्ररुप धारण केल असून चार वर्षानंतर यंदा प्रथमच गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा