आता दुष्काळाचे ढग दूर, लातूरमध्ये पाणी भरपूर !

September 25, 2016 3:39 PM0 commentsViews:

latur_rain33

लातूर, 25 सप्टेंबर : दुष्काळी समजल्या जाणा•ऱ्या लातूर जिल्ह्यात आता पाणीच पाणी झालंय. चोहीकडे पावसानं कहर केला असून जिल्हा ओलाचिंब झालाय. जिल्ह्यात गेली आठ दिवसांपासून सतत पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरडे ठाक पडलेले नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत.

दुष्काळाने होरपळून निघालेला लातूर जिल्हा आता ख•ऱ्या अर्थाने सुखावलाय. पाण्यासाठी वणवण भटकणा•ऱ्या लातूरकरांना वरुणराजेने ओलाचिंब भिजवलंय. लातूरकरांची पाण्यासाची समस्या परतीच्या पावसाने आपल्यासोबत घेऊन गेलाय. मागील अनेक वर्ष जिल्ह्यातील नदी नाले कोरडे पहायला मिळत होते. परतीच्या पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. एवढंच नाहीतर तालुक्यातून कातपुर मार्गे लातूर, निलंगा रस्ता पूर्णपणे ठप्प झालाय. तावरजा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. हिपर्सोगा, गोंद्री हसेगाव या सोबत पंधरा गावांचा संपर्क तुटलाय. सतत पाऊस पडत आसल्यामुळ उद्या पर्यंत अशीच स्थिती राहील असा अंदाज वर्तवला जातोय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा