भारतीय सैन्य बोलणार नाही तर करून दाखवतील -पंतप्रधान मोदी

September 25, 2016 5:04 PM0 commentsViews:

modi_man_ki_baat25 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून काश्मिरी जनतेची पाठराखण करत पाकिस्तानला खडेबोल सुनावले. भारतीय सैन्य कधी बोलत नाही तर करून दाखवते असे गौरवद्गार काढत आम्ही काश्मिरी जनतेच्या सोबत असून त्यांना सुरक्षित वातावरण मिळालं पाहिजे अशी ठाम भूमिका मोदींनी मांडली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमध्ये झालेल्या भाषणानंतर मन की बात कार्यक्रमात उरी हल्ल्याचा निषेध केला. तसंच पंतप्रधान मोदींनी काश्मिरी जनतेचाही उल्लेख केला. काश्मीरचे लोक आता देशविरोधी घटकांना ओळखू लागले आहे. काश्मीरच्या भावी पिढीला शांततापूर्ण आणि सुरक्षित वातावरण मिळेल, याची आम्ही काळजी घेऊ अशी ग्वाही मोदींनी दिली.

तसंच काश्मिरी लोकांना शांतीपूर्ण आयुष्य देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असंही ते म्हणाले. शांती, एकता आणि सद्भावनाही आपल्या समस्यावर उपाय आणि प्रगती,विकासाचा मार्ग आहे. प्रत्येक समस्येवर तोडगा काढण्यासाठी आपल्याला मिळून मिसळून काढवा लागणार आहे असं मतही मोदींनी व्यक्त केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा