देशी गायींचा ‘रखवाला’,पठाण कुटुंबियाची यशोगाथा !

September 25, 2016 6:09 PM0 commentsViews:

पुणे, 25 सप्टेंबर : भारतात गोवंशाच्या बाबतीत सध्याची भारताची परिस्थिती आपत्कालीन आहे. देशी गोवंश जतन करुन तो वाढवण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील लोणीदेवकर येथील माजीदखान पठाण यांच्याकडे आज दोनशेपेक्षा जास्त गायी आहेत. पठाण यांच्याकडे भारतातल्या वेगवेगळ्या वानाच्या देशी गाय़ींचे गेल्या तीन पिढ्यापासून संगोपन सुरू आहे. या बाबतचा हा स्पेशल रिपोर्टmajid_pathan

इंदापूर तालुक्यातील लोणीदेवकर येथील माजीदखान पठाण आणि त्यांचे कुटुंबीय मागील तीन पिढ्यापासून घरात देशी गायीचे पालन करत आहे. नुसते गायींचे पालन नाही, तर संगोपनही केले जात आहे. भारतीय वंशाच्या गायी या मानवी आरोग्यासाठी आणि शेतीसाठी खूप महत्वाच्या आहेत. देशी गायी देशाच्या अर्थकारणाचा आणि शेतक•यांचा कणा आहे. पठाण यांच्या कुटुंबियांनी गोवंश पालनाचे महत्त्व ओळखल्यामुळे त्यांच्याकडे गोवंश पालन केले जात आहे. पठाण यांनी गीर आणि खिलार गाय़ींच्या शास्त्रशुद्ध व्यवस्थापनातून जातीवंत दुधाळ गायी आणि वळू तयार केलेले आहेत. देशी गाय़ींचे संगोपन त्यांना फायद्याचे ठरले आहे.

माजीदखान पठाण, वडिल रज्जाक पठाण, भाऊ जूबेर पठाण यांनी खासकरुन खिलार आणि गीर गाय़ींच्या संगोपनाकडे लक्ष दिले. या दहा वर्षांत त्यांच्या गोठ्यात जातीवंत दुधाळ तसंच गीर गाय़ींचे वळू तयार झाले आहेत. खिलार जनावरे सांभाळणा•या घराण्याची आवड असल्याने शास्त्र शुद्ध पद्धतीने जातीवंत खिलार गाय़ी वळू तयार केले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे पठाण यांच्या गोठ्यावर तयार झालेल्या प्रिन्सया देशी खिलार जातीच्या वळूने राज्यात तसंच देशपातळीवरील चॅम्पियन हा पुरस्कार सुद्धा पटकावला आहे. सध्या पठाण यांच्या गोट्यात प्रती दिन आठ लिटर दूध देणारी खिलार गायी आहे. तर प्रतिदिन वीस ते पंचवीस लिटर दूध देणा•या गीर गाय़ी आहेत. देशी गोवंशही चांगले दूध देतो. त्यामुळे देशी गोवंशही अधिकाधिक लोकांनी पाळावा असे आवाहनंही ते करतात. पठाण यांच्याकडे खिलार, गीर, कांक्रेज,देवणी, पंगानुर या जातीच्या गायी आहेत. इतकेच काय तर गाईंच्या गोवंशात अन्यसाधारण महत्व असणारी काऴी कपिला जातीच्या गायीचा वंश पठाण आवर्जून जपत आहेत. तर राज्यातून अनेक शेतकरी हा गाय़ींचा गोटा आवर्जून पाहण्यासाठी येत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा