मुंबईत पाणीकपात नाही

April 20, 2010 11:52 AM0 commentsViews: 12

20 एप्रिलमुंबईत 15 जुलैपर्यत पाणी कपातीत वाढ होणार नाही, अशी ग्वाही पालिका आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी दिली आहे. मुंबईला पाणी पुरवणार्‍या तलावांमध्ये गेल्या वर्षी 4 लाख 36 हजार दशलक्ष लीटर एवढा जलसाठा होता. यावर्षी हा साठा 2 लाख 56 हजार 363 लीटर इतका खालावला आहे. सध्या 2 हजार 900 दशलक्ष लीटर पाणी मुंबईला दररोज पुरवले जाते. त्यात कोणतीही कपात होणार नसल्याचे आयुक्तांनी सांगितले. पण त्यासोबतच पाईपलाइन फुटून लाखो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. पाण्याची गळती आणि चोरी पालिकेला रोखता आली नाही, अशी कबुलीही यानिमित्ताने पालिका आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी दिली आहे.

close