डाऊसंदर्भांत प्रकाश आंबेडकरांच्या पांठिब्यावरून वारकर्‍यांमध्ये दुमत

October 16, 2008 3:50 PM0 commentsViews: 7

16 ऑक्टोंबर, मुंबईडाऊ प्रक्रल्पाला विरोध करणार्‍या वारकर्‍यांना प्रकाश आंबेडकर यांनी पांठिबा दिला आहे. डाऊ प्रकल्पाला विरोध करणार्‍या वारकर्‍यांना अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर समन्वय समितीच्या स्वरुपात एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. वारकर्‍यांना आपल्या बाजूनं करण्यासाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री वारकरी असला पाहिजेच, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. पण आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही, असं वारकर्‍यांनी ठणकावून त्यांना सांगितलं.महाराष्ट्रात वारकर्‍यांची ताकद मिळवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी औरंगाबादमध्ये मराठवाडास्तरीय वारकरी परिषद बोलावली. त्यात त्यांनी आपली भूमिका मांडली. या वारकरी परिषदेला वारकर्‍यांची फारशी उपस्थिती नसली तरी त्यांच्या या भूमिकेचं काही वारकर्‍यांनी समर्थनही केलं आहे. मात्र त्याचवेळी प्रकाश आंबेडकरांची वारकरी समन्वय समिती कशासाठी, असा सवाल करून त्यांचा विचार पटत नसल्याचंही काहीजण सांगत होते. आंबेडकरांच्या या परिषदेनंतर औरंगाबादमध्ये वारकर्‍यांची एक बैठक झाली. या बैठकीत आपण कुठल्याही समन्वय समितीत जाणार नसल्याचं वारकर्‍यांनी स्पष्ट केलं.

close