मेघनाने जिंकली चिमुकल्यांची मनं

September 25, 2016 7:28 PM0 commentsViews:

25 सप्टेंबर  : ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये आयपीएच आणि स्वयम या मासिकातर्फे एका आगळ्या वेगळ्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मुलांचे विचार, त्याची स्वप्न, त्यांच्या भावना आणि त्यांची आवड याची सांगड घालून एका प्रश्नोत्तर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.

या स्पर्धकांमध्ये सातव्या आणि नवव्या इयत्तेतील मुले सहभागी झाली होती. स्पर्धेसाठी राज्यभरातून आलेल्या 52 मुलांपैकी 5 मुलांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली. अशा प्रकारचे कार्यक्रम हे मुलांच्या आत्मविश्वासात भर टाकण्यासाठी आवश्यक असल्याचं मत मान्यवरांनी व्यक्त केलं. तर यावेळी अभिनेत्री मेघना एरंडे हीने लहान मुलांना आवडणा•या कार्टून कॅरेक्टर्सचा आवाज काढून सगळ्यांना हसवून टाकलं. मुलांसाठी सुरू झालेला हा उपक्रम राज्यभर राबवला जावा अशी मागणी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा