सेमी फायनलची धूम नवी मुंबईत

April 20, 2010 12:52 PM0 commentsViews:

20 एप्रिलआयपीएलची सेमी फायनलची धूम रंगणार आहे, ती नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर. येत्या 21 तारखेला पहिली तर 22 तारखेला दुसरी सेमी फायनल खेळवली जाणार आहे.यातील पहिली सेमी फायनल असेल ती पहिल्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्स आणि बंगलोर रॉयल चॅलेंजर्स दरम्यान. मुंबईने 14 पैकी 10 मॅच जिंकत पहिला क्रमांक पटकावला. तर बंगलोरने 14 पैकी 7 मॅचमध्ये विजय मिळवला आहे. पण सरस रनरेटच्या आधारावर त्यांनी सेमी फायनलमधील आपली जागा पक्की केली आहे. 21 तारखेला रात्री 8 वाजता ही मॅच खेळली जाईल.दुसरी मॅच रंगेल ती गतविजेत्या डेक्कन चार्जर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज दरम्यान. सुरुवातीला तळाला असणार्‍या डेक्कनने जबरदस्त कमबॅक करत सेमी फायनलमध्ये धडक मारली. तर चेन्नईनेही सुपर कामगिरी करत तिसर्‍या क्रमांकावर झेप घेतली आहे. आयपीएलमध्ये चेन्नईने सलग तिसर्‍यांदा सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

close