किसान रॅलीत राहुल गांधींवर बूटफेक

September 26, 2016 4:03 PM0 commentsViews:

rahul_gandhi_raillyउत्तरप्रदेश, 26 सप्टेंबर : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवर सीतापूरमध्ये बूटफेक करण्यात आलीये. सुदैवानं हा बूट त्यांना लागला नाही. बुटफेकणा•ऱ्या व्यक्तीना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सीतापूरमध्ये आज राहुल गांधी किसान रॅलीमध्ये सहभागी झाले होते. ओपन जीपमधून राहुल गांधी सर्वांना अभिवादन करत पुढे चालले होते. त्याचवेळी त्यांच्या दिशेनं हरिओम मिश्रा नावाच्या व्यक्तीनं बूट भिरकावला. हरिओम मिश्रा हा स्थानिक पत्रकार असल्याचं सांगण्यात येतंय. राहुल गांधी लोकांच्या डोळ्यात धूळ फेकत असल्याचा आरोप हरिओम मिश्रानं केलाय. पोलिसांनी हरिओम मिश्राला ताब्यात घेतलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा