बुलडाण्यातही मराठा समाजाचा विराट मोर्चा

September 26, 2016 4:41 PM0 commentsViews:

maratha_marorchaबुलडाणा, 16 सप्टेंबर : कोपर्डीतील आरोपींना फाशी आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुलडाणा शहरात मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला. मराठा समाजाच्या विराट मोर्चात शिस्त आणि एकीचे दर्शन घडलं. या मोर्चात 5 लाख लोकांनी आपला सहभाग नोंदवला. तर शेतकरी कुटंुबातील मुलींनी जिल्ह्याधिका•ऱ्यांना निवेदन दिले.

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, ऍट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारावी, यासह अन्य मागण्यांसाठी आज बुलडाण्यात मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण जिल्ह्यातच मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्याकरिता पाच लाख लोकया मोर्चात सहभागी झाले होते तर महिला आणि मुली सुद्धा या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .

स्टेजवर फक्त अकरा मुलीच होत्या या मुली शेतमजूर कुटुंबातील होत्या. याच मुलींनी जिल्हाधिका•यांना निवेदन दिलं. जयस्तंभ चौक, संगम चौक, स्टेट बँक चौक, मलकापूर रोडवरील चावडी चौक, या परिसरात केवळ महिलाच होत्या. मोर्चानंतर शहरात कचरा राहू नये, यासाठीची विशेष काळजीही घेण्यात आली आहे. मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पृष्ठभूमीवर जिल्हयातील काही खासगी शाळा, महाविद्यालयांनी सोमवारी सुट्टी जाहीर केली होती. शेतकरीही मोठ्या संख्येने य मोर्चात सहभागी होतं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा