मुख्यमंत्र्यांनी रहावं, पण मराठा आरक्षण द्यावं -नारायण राणे

September 26, 2016 5:12 PM0 commentsViews:

26 सप्टेंबर : मराठा मोर्चांच्या मुद्द्यावरून आता राजकारणही तापू लागलंय. मुख्यमंत्र्यांनी राहावं, पण मराठा आरक्षण द्यावं, असा टोला काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. IBN लोकमतला त्यांनी रोखठोक मुलाखत दिली.

rane_on_cm4राज्यभरात लाखोंच्या संख्येनं मराठा क्रांती मोर्चे निघत आहे. या मोर्च्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला हटवून मराठा समाजाचे प्रश्न सुटणार नाही असं सुचक वक्तव्य केलंय. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा नारायण राणेंनी खरपूस समाचार घेतला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री फक्त आश्वासनं देतात, खासगीत असं असं बोलणं झालं म्हणून सांगतात. आश्वासनं देतात. हे सगळं त्यांनी बंद करावं आणि आरक्षण द्यावं, अशी मागणी राणेंनी केली.

ऍट्रॉसिटी कायद्यावरही राणेंनी भाष्य केलं. ऍट्रॉसिटी कायदा रद्द करा अशी मागणी कुणीही करत नाहीये. त्यातली जी जाचक कलमं आहेत, त्याचा आढावा घ्या, फेरविचार करा, ही आमची मागणी आहे, असंही राणेंनी स्पष्ट केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा