कुत्र्याच्या पिल्लांना नेण्यास विरोध करणाऱ्या मायलेकींना मारहाण

September 26, 2016 6:36 PM2 commentsViews:

kotharud_socityपुणे, 26 सप्टेंबर : कुत्र्याची पिल्लं घेऊन जाणा•या पालिकेच्या श्वान पथकाला विरोध केला म्हणून शेजा•ऱ्याने मायलेकींनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना कोथरुडमध्ये घडलीये. मिलींद काळे असं मारहाण करण्या•याचे नाव असून त्याला अटक करण्यात आलीये.

कोथरूड परिसरात महात्मा सोसायटीत राहणाऱ्या सेजल सराफ आणि तिच्या आईला त्याच सोसायटीत राहणा•या मिलिंद काळे याने जबर मारहाण केली. 24 सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती. आणि हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

सेजल सराफ ही तरुणी प्राणीमित्र संघटनेचं करता काम करते. सोसायटीच्या आवारात कुत्र्याची दोन पिल्लं होती. पिल्लं ठेवण्याला मिलिंद काळेचा विरोध होता. ही पिल्लं पकडून नेण्यासाठी मिलींद काळेनं पालिकेचं पथक बोलावलं होतं. मात्र, ही पिल्लं 2 महिन्यांची असल्याने नेऊ नये असं सांगत तरुणीने विरोध केला होता. यावरुन मिलींद काळे आणि या तरुणीमध्ये बाचाबाची झाली. बाचाबाचीतून काळेनं या मायलेकींना जबर मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर मिलींद काळेला अटक करण्यात आली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Nilesh Bhanage

    TYA MILIND KALE CHI NASBANDI KARUN TYALA DOG VAN BAROBAR RELOCATE KARUN TAKA…HA 2 PAYACHA KUTRA AHE!

  • Akshay Kasurde

    Milind kale sarkhya mansala la kadak
    Shiksha zali payze…. He did Shame full action and irresponsible behavior. ….