काश्मीर हा भारताचाच, पाकने स्वप्न पाहणे सोडून द्यावे-सुषमा स्वराज

September 26, 2016 8:08 PM0 commentsViews:

sushma_swaraj_uni26 सप्टेंबर : दहशतवादाला जन्म देणं, वाढवणं आणि त्याची निर्यात करणं हे पाकिस्तानचे उद्योग आहे. एकीकडे दहशतवाद्यांना पोसायचं आणि दुसरीकडे मैत्रिपूर्ण चर्चा करायची हे आता शक्य नाही. पाकिस्तानने काश्मीरचे स्वप्न पाहणे सोडून द्यावे काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहणारच अशा कडक शब्दांत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्राच्या सभेत पाकिस्तानला सुनावले.

उरी दहशवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये संबंध कमालीचे ताणले गेले. संयुक्त राष्ट्राच्या सभेत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज काय भूमिका मांडणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. 120 कोटी भारतीयांचं प्रतिनिधीत्व करणा•या सुषमा स्वराज यांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात असलेली खदखद स्वराज यांनी संयुक्त राष्ट्राच्या सभेत बोलावून दाखवली.

विशेष म्हणजे, सुषमा स्वराज यांनी हिंदीतून भाषण केलं. भाषणाच्या सुरुवातील त्यांनी मानवता, शांती आणि गरिबीवर भाष्य केलं. त्यानंतर दहशतवादाकडे मोर्चा वळवला. दहशतवाद हा मानवतेचा अपराधी आहे. दहशतवाद हा आमचा आणि तुमचा असा नसतो. दहशतवाद हा दहशतवाद असतो. आज दहशतवाद सर्वांना भस्म करणारा राक्षसरुपात समोर उभा ठाकला आहे. आता मतभेद विसरुन दहशतवादाविरोधात एकत्र येण्याची गरज आहे असं आवाहन स्वराज यांनी केलं.

21 सप्टेंबरला पाकिस्तानेच पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भाषणाचा समाचार घेत सुषमा स्वराज यांनी “जिनके घर शिशे के होते हे वो दुसरो के घर पर पत्थर नही फेका करते” अशा शब्दात पाकिस्तानला खडेबोलही सुनावले.

काश्मीरला भारतापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो राहणारच. पाकिस्तानने काश्मीर मिळवण्याचे स्वप्न पाहणे सोडून द्यावे असा सणसणीत टोला स्वराज यांनी पाकला लगावलाय.

आम्ही मैत्री मागितली तर आम्हाला पठाणकोटचा हल्ला मिळाला. दहशतवाद्यांना पोसणाच्या पाकिस्तान सारख्या देशाला व्यसन लागलंय. नवाज शरीफ मानवधिकारच्या मुद्यावर बोलता पण आपल्या घरात काय शिजतंय हे आधी पाहावं असा पलटवारही स्वराज यांनी शरीफ यांच्यावर केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा