पवार मोदींना हटवणार

April 20, 2010 1:05 PM0 commentsViews: 1

20 एप्रिलआयपीएलच्या कोची टीमच्या पीचवर शशी थरूर यांची विकेट गेली. आता नंबर आहे आयपीएलचे कमिशनर ललित मोदी यांचा. ललित मोदी यांना पदावरून हटवण्यासाठी शरद पवार राजी झाल्याचे समजते. अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी शरद पवारांची आज भेट घेतली. ललित मोदींना पदावरून हटवलेच पाहिजे, असे त्यांनी पवारांना ठामपणे सांगितल्याचे समजते.त्यानंतर पवार यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांची भेट घेतली. आणि आतापर्यंत मोदींची पाठराखण करणार्‍या पवारांनी मोदींना हटवायला हवे, असा निरोप मनोहर यांना दिला. दरम्यान दुबईला आयसीसीच्या बैठकीसाठी गेलेले मोदी मुंबईत परतले आहेत. आता ते दिल्लीत शरद पवारांच्या भेटीसाठी गेले आहेत.

close