सत्यपाल सिंग यांच्या बदलीवरून मतभेद

April 20, 2010 1:14 PM0 commentsViews: 6

20 एप्रिलपुण्याचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांच्या बदलीवरून गृहमंत्री आर. आर. पाटील आणि गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्यात मतभेद झाले आहेत. रमेश बागवे यांनी आज विधानपरिषदेत ही घोषणा केली. पण बदलीबाबत आपल्याला बागवे यांनी काहीच माहिती दिली नव्हती, असा गौप्यस्फोट आर. आर. पाटील यांनी केला. तसेच पुण्याच्या ढासळत चाललेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत एकटे सत्यपाल सिंगच जबाबदार नाहीत, असे म्हणत आबांनी सत्यपाल सिंगांची पाठराखणही केली. त्याचबरोबर पुढच्या वर्षी पुण्यात 1500 नवीन पोलीस शिपायांची भरती केली जाणार असल्याचे त्यांनी आपल्या उत्तरात सांगितले. महिलांवरच्या अत्याचारांसंदर्भातील कायदे अधिक कडक करण्यासाठी न्यायमूर्ती धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली काही महिला संघटनांच्या प्रतिनिधींची एक समिती बनवली जाईल, असेही आर. आर. पाटील यांनी स्पष्ट केले.

close