राज्य सरकारचा विशेष गट फोडणार मराठा मोर्च्याची कोंडी ?

September 26, 2016 10:54 PM0 commentsViews:

nagar_maratha26 सप्टेंबर : राज्यभरात लाखोंच्या संख्येनं कोणत्या नेतृत्वाशिवाय निघणा•ऱ्या मराठा क्रांती मोर्च्याची राज्य सरकारला चांगलीच धडकी भरलीये. आता या मोर्च्याची कोंडी कशी फोडायची यासाठी राज्य सरकारने कंबर कसलीये. मराठा आयोजकांशी चर्चा करण्यासाठी विशेष गटाची स्थापना करण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

कोपर्डी प्रकरणानंतर राज्यभरात मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येनं मोर्च निघत आहे. कोपर्डी प्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा, मराठा आरक्षण आणि ऍट्रॉसिटी कायद्याबद्दल करण्याच्या मागणीसाठी हे मूकमोर्चे निघत आहे. या मोर्च्याची राज्य सरकारला दखल घ्यावीच लागली. आता मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांशी सरकार चर्चा करायला तयार आहे अशी माहिती सूत्रांनी दिलीये. मराठा क्रांती मोर्चाची कोंडी फोडण्यासाठी विशेष गटाची स्थापना करण्याचा प्रस्ताव आहे. एक मंत्री आणि दोन विरोधी पक्षनेते मंत्रिगटात असतील. हा मंत्रिगट जिल्ह्याजिल्ह्यांत जाऊन मोर्चा आयोजकांशी चर्चा करणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा