आमदार निधी दीड कोटींवर

April 20, 2010 1:32 PM0 commentsViews: 4

20 एप्रिलआमदारांचा निधी आता एक कोटीवरून दीड कोटी होणार आहे. अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी विधानसभेत ही घोषणा केली. मुंबईच्या नगरसेवकांचा विकास निधी 1 कोटी 40 लाख रुपये होता. मात्र आमदारांचा निधी मंुबईच्या नगरसेवकांपेक्षाही कमी आहे, तो आता वाढणार आहे. आज विधानसभेत विनियोजन विधेयक मंजूर करत असताना आमदारांचा निधी 2 कोटी करण्याची मागणी विरोधकांनी केली. त्याला सत्ताधारी आमदारांनीही साथ देत सभागृहात घोषणाबाजी केली. सभागृहात यामुळे गोंधळ झाल्याने सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले.त्यानंतर अर्थमंत्र्यांनी 25 लाख रूपये वाढवून देण्याची घोषणा केली. मात्र विरोधकांचे समाधान न झाल्याने शेवटी अर्थमंत्र्यांनी दीड कोटी रूपयांपर्यंत आमदार निधी देण्याची घोषणा केली.

close