मुंबई मेट्रोच्या 2 नव्या मार्गांना राज्य सरकारचा ‘हिरवा कंदील’

September 27, 2016 2:04 PM0 commentsViews:

mumbia-metro1111

27 सप्टेंबर : मुंबई मेट्रोच्या दोन नव्या मार्गांना आज (मंगळवारी) राज्य सरकारने हिरवा कंदील दिला. मुंबई मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला म्हणजेच मेट्रो 2 ब आणि मेट्रो 4 च्या मेट्रो प्रकल्पांचा समावेश आहे.

मेट्रो मार्ग- 2 ब मध्ये डीएननगर ते मंडाळे या 24 कि.मी.च्या मार्गावर 22 स्थानके आहेत. यासाठी 10 हजार 970 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.  मार्च 2020 या कालावधीत हा मार्ग पूर्ण केला जाणार आहे. तर दुसऱ्या मार्गामध्ये वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली या 33 कि.मी. लांबीचा मेट्रो मार्ग- 4चा प्रकल्प असेल. या प्रकल्पात 32 स्थानके उभारली जाणार आहेत. हा मार्ग पूर्ण करण्यासाठी 14 हजार 549 कोटींचा निधी लागणार आहे. हा प्रकल्प एप्रिल 2017 ते जुलै 2021 या 52 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केला जाणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा