कॉर्पोरेट अफेअर्सचे माजी महासंचालक बी.के. बन्सल यांची मुलासह आत्महत्या

September 27, 2016 12:16 PM0 commentsViews:

B K Bansal

27 सप्टेंबर : कॉर्पोरेट अफेअर मंत्रालयाचे माजी महासंचालक बी. के. बन्सल यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे त्यांच्यासोबत त्यांच्या मुलानेही आत्महत्या केली आहे. या दोघांचीही मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळली आहेत. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी पुढचा तपास सुरू केला आहे.

बी. के. बन्सल भारतीय कॉर्पोरेट कायदा, कॉर्पोरेट सेवाचे (आईसीएलएस) वरिष्ठ प्रशासकीय ग्रेड अधिकारी होते. मागच्या वर्षी त्यांची कॉर्पोरेट व्यवहार संचालक पदी पदोन्नती झाली होती. बन्सल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते. त्या पार्श्वभूमीवर बन्सल यांची सीबीआयकडून चौकशी ही सुरू होती. तसंच त्यांच्या घरावर छापेही मारण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी याच कारणांवरून बी के बन्सल यांच्या पत्नी आणि मुलीनेही  आत्महत्या केली होती. त्यानंतर आज बन्सल आणि त्यांच्या मुलानेही आत्महत्या केल्याने त्यांच्या अख्खं कुटुंबच आता नाहीसं झालं आहे.

दरम्यान, चौकशी दरम्यान सीबीआय त्रास देत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वीच बन्सल यांनी कोर्टात केला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा