व्यंगचित्राचा मराठा मोर्चाशी संबंध नाही, ‘सामना’तून शिवसेनेचं स्पष्टीकरण

September 27, 2016 9:03 AM0 commentsViews:

Samana123

27 सप्टेंबर :  सामनातील व्यंगचित्र व्हायरल करण्यामागे समाजकंटकांचा हात असल्याचं स्पष्टीकरण आजच्या सामनातून देण्यात आलं आहे. या व्यंगचित्राचा मराठा मोर्चाशी काहीही संबंध नाही. शिवसेना ही मराठा मोर्चांच्या पाठिशी ठामपणे उभी असून मराठा समाजाच्या मागण्यांना पक्षाचा पाठिंबा आहे, असं खुलासा देखील आज (मंगळवार)च्या सामनामध्ये करण्यात आला आहे.

‘सामना’मध्ये मराठा मूकमोर्चाबाबत काल (सोमवारी) एक व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आलं होतं. ते व्यंगचित्र मराठा समाजाचा अवमान करणारे आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सर्व स्तरांतून उमटली. त्या व्यंगचित्रामुळं मोठा वाद उद्भवला असून राज्यभरात त्याचे पडसाद उमटले. अनेक ठिकाणी शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी करत ‘सामना’चे अंक जाळण्यात आले. सोशल मीडियावरूनही जोरदार टीका झाली. विरोधी पक्षांनीही हा मुद्दा उचलून धरत शिवसेनेवर नेम धरला.

दरम्यान, ‘भडका’ उडाल्यानंतर व्यंगचित्राबाबत ‘सामना’नं खुलासा केला आहे. मराठा समाजाचा राजकीय फायद्यासाठी वापर करणाऱ्यांनीच ‘त्या’ व्यंगचित्राबाबत अफवा पसरवल. योग्य दिशेने चाललेले आंदोलन भरकवटण्याचा डाव कार्यकर्त्यांनीच उधळून लावल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत. तर, मराठा समाजाचा आक्रोश हे राजकारण नसून भावनिक आंदोलन आहे. त्यांच्या भावनांशी शिवसेना सहमत आहे. त्या भावनांचा अपमान करण्याचा प्रश्नच नाही, असं मत शिवसेना नेते आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा