‘जे जे’च्या जागेवर नवीन मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल

September 27, 2016 2:45 PM0 commentsViews:

JJ hospital231

27 सप्टेंबर :  राज्यातील सर्वात मोठं  हॉस्पिटल असलेल्या जे जे रुग्णालयाच्या नुतनिकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. 150 वर्ष जुनी इमारत आता इतिहास जमा होणार असून त्या जागी नवीन मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. सुमारे 650 कोटी रुपये ची अद्ययावत मल्टी स्टोरेज इमारत उभी राहणार आहे.

टप्या टप्याने इमारती पाडून नवीन इमारतीचा विस्तार करणार येणार आहे. डिसेंबर महिन्यात नवीन हॉस्पिटलचं भूमिपूजन होणार आहे. 2 वर्षात ही इमारत पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे.

पुढील आठवड्यात एल आकाराच्या इमारती पासून सुरवात होणार आहे. मुख्यमंत्रीं देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या देखरेखित बांधकाम  होणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा