शासकीय वसाहतीतील घरे देण्यास नकार

April 20, 2010 1:37 PM0 commentsViews: 7

20 एप्रिलमुंबईतील वांद्रे येथील शासकीय वसाहतीतील घरे कर्मचार्‍यांना कायमस्वरुपी देता येणार नाहीत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी घरे द्यायला ठाम नकार दिला आहे. आमदार अनिल परब यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सभागृहात उपस्थित केली. मात्र विकासासाठी 1 हजार 282 कोटी रूपयांच्या मोबदल्यात 20 एकर जमीन देण्यात आली आहे. उर्वरित 73 एकर जमीन सरकारकडेच राहणार असल्याचे उपमुख्यमंत्रांनी सांगितले.यावर परप्रांतीयांसह अन्य सहकारी संस्थांना जागा देणार्‍या सरकारने मराठी शासकीय कर्मचार्‍यांनाही घरे द्यावीत, अशी मागणी करत विरोधकांनी सभागृहात गदारोळ केला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तीन वेळा तहकूब करण्यात आले. या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन भुजबळांनी दिले. पण त्याने समाधान न झालेल्या विरोधकांनी सभात्याग केला.

close