मुंबईत एका कुटुंबाने किती गाड्या घ्यावा ?, कोर्टाची सरकारला विचारणा

September 27, 2016 5:56 PM0 commentsViews:

court_on_carमुंबई, 27 सप्टेंबर : मुंबईत प्रत्येक कुटुंब जास्तीत जास्त किती वाहनं घेऊ शकतं यावर धोरणात्मक निर्णय घेण्याचा राज्य सरकारने विचार करावा अशी सूचना मुंबई हायकोर्टाने केली आहे.

मुंबईत दररोज 1300 ते 1400 नव्या वाहनांची भर पडतेय. शिवाय एकाच कुटुंबात अनेक वाहनं आहेत. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळं मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. पर्यायी वाहतूक व्यवस्थेबद्दल राज्य सरकारनं काय उपाययोजना केल्या आहेत याची माहिती द्यावी असाही कोर्टाने राज्य सरकारला आदेश दिला आहे.

उड्डाणपूलांखाली वाहनांचं पार्किंग करण्याला मनाई करण्यासाठी राज्य सरकारने दिलेलं सुरक्षेचं कारण अजूनही कायम आहे का अशी विचारणाही मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. प्रशांत पोळेकर यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयानं ही विचारणा केली आहे.

तसंच अशा पार्किंगबद्दलच्या धोरणात बदल करण्याबद्दल राज्य सरकार काही आढावा घेण्याचा विचार करत आहे का अशी विचारणाही कोर्टाने केली आहे. मुंबईत जल वाहतुकीबद्दल राज्य सरकार काही विचार करत आहे का अशी विचारणाही कोर्टाने केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा