सहामहिन्यात विकासआराखडे मराठीत प्रसिद्ध करा, हायकोर्टाचे सरकारने आदेश

September 27, 2016 6:11 PM0 commentsViews:

M_Id_404282_mumbai_high_courtमुंबई, 27 सप्टेंबर : मुंबईसह सर्व शहरातील विकासआराखडे इंग्रजीसह मराठीतही प्रसिद्ध करा असे आदेश मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला दिले आहे. तसंच ही प्रक्रीया 6 महिन्यात पुर्ण करण्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहे.

राज्यातील जनता ही मराठी भाषिक असून प्रत्येक नागरिकाला विकास आराखडय़ातील नेमके काय मुद्दे आहेत हे समजलं पाहिजे आणि त्यामुळे हे सगळे आराखडे इंग्रजीसोबत मराठीतही असले पाहिजेत अशी मागणी करणारी जनहित याचिका संतराम तराले यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती, त्यावर कोर्टाने हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने ही प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे अशी माहिती कोर्टाला दिली पण ही सगळी प्रक्रीया सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश देत याचिका निकाली काढली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा