भर स्टुडिओत मुद्यावरुन गुद्यावर

September 27, 2016 9:18 PM0 commentsViews:

अमेरिका, 27 सप्टेंबर : जॉर्जियात सध्या निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलाय. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना आयबेरिया टीव्ही वरच्या एका शोमध्ये दोन राजकीय पक्षांचे नेते मुद्यावरून गुद्यावर आले. चर्चा सुरू असताना लगेच दोनही नेते भांडणावर आले. एका नेत्यानं दुस•याला टेबलवर ठेवलेला पाण्याचा ग्लास फेकून मारला..तर दुस•या पाहुण्यानंही जशास तसे या न्यायानं परतफेड केली. दोन्ही नेत्यांना आवरण्यासाठी शोच्या अँकरला मोठे प्रयत्न करावे लागले तेव्हा कुठे पाहुणे शांत झाले आणि अनर्थ टळला. 8 ऑक्टोबरला जॉर्जियात सार्वत्रिक निवडणुका आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा