शिवसेनेला ‘मुका’ घेणं महागात पडणार ?

September 27, 2016 10:09 PM1 commentViews:

27 सप्टेंबर : सामना दैनिकातून मराठा मोर्चाविरोधात प्रकाशित झालेलं व्यंगचित्र शिवसेनेला चांगलंच महागात पडण्याची चिन्हं आहेत. या मुका व्यंगचित्राविरोधात संभाजी ब्रिगेडवाले फक्त सामनाच्या अंकाची होळी करूनच थांबले नाहीत तर वाशीमधल्या सामनाच्या कार्यालयावर दगडफेकही करण्यात आलीय. त्यामुळे हे मराठा मोर्चाचं हे कोर्टून शिवसेनेवरंच बुमरँग ठरण्याची चिन्हं दिसताहेत.

मराठा मोर्चांवर सामनात छापून आलेलं हेच ते वादग्रस्त व्यंगचित्र…या व्यंगचित्रामुळे स्रियांचा अवमान झाल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडने सोमवारी पुण्यात सामनाच्या अंकांची होळी केली.तसंच संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.sena_morcha_pkg

दरम्यान, सामनातलं ते वादग्रस्त व्यंगचित्र छापून नसतं आलं तर बरं झालं असलं, अशी स्पष्ट कबुली शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गो•हे यांनी दिलीय.

या व्यंगचित्रामुळे शिवसेनेतल्या मराठा नेत्यांमध्येही मोठी अस्वस्थता आहे. पण साहेबांविरोधात कोण बोलणार म्हणून अनेकजण गप्प आहे. त्यामुळे झाल्याप्रकाराबद्दल सामना दैनिकातून खुलासाही छापून आलाय. पण माफी काही मागितली गेलीच नाही, परिणाम स्वरूप व्हायचं तेचं झालं. संभाजी ब्रिगेडने ठाण्यात सामनाच्या ऑफिसवर शाईफेक केलीय तर नवीमुंबईत दगडफेक केलीय. त्यामुुळे पोलिसांनी खबरदारी म्हणून प्रभादेवीतल्या कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त वाढवलाय.

तसंही शिवाजी महाराजांवर हक्क सांगण्यावरून संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेमध्ये पूर्वीपासूनच वाद आहे. अशात सामनातून हे मराठा मोर्चाविरोधी व्यंगचित्र छापून आल्याने, संभाजी ब्रिगेड पुन्हा आक्रमक झालीय. त्यामुळे शिवसेनेतल्या मराठा नेत्यांची चांगलीच गोची झालीय. पाहुयात उद्धव ठाकरे यातून नेमका कसा मार्ग काढताहेत ते…कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर सामनातून मराठांच्या विरोधात हा असा व्यंगात्मक संदेश जाणं शिवसेनेला कदापिही परवडणारं नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Ravindra Patil

    Shiv Sena madhe marath kute ahet bakiche baher pada shiv Sena madhun jar marath asale tar