व्यंगचित्रामुळे सैनिकच दुखावले,आमदार-खासदारकीचे दिले राजीनामे

September 27, 2016 10:37 PM0 commentsViews:

 sena_mla_resign

बुलडाणा, 27 सप्टेंबर : ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्रामुळे आता शिवसेनेत राजीनामासत्राला सुरुवात झाली आहे. बुलडाण्यात शिवसेनेच्या दोन आमदार आणि एका खासदाराने राजीनामा दिला आहे. त्यांनी आपले राजीनामे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केले आहे.

राज्यभरात सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्च्यावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये ‘अतिविराट मुका मोर्चा’अशा आशयाचं एक व्यंगचित्र छापण्यात आलं. साहजिकच या व्यंगचित्राचे तीव्र पडसाद उमटले. आज नवी मुंबई आणि ठाण्यात ‘सामना’च्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्याची जबाबदारी संभाजी ब्रिगेडने स्विकारली आहे.

हे होत नाही तेच सेनेला आणखी एक धक्का बसलाय. बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर मेहकरचे आमदार संजय रायमुलकर आणि सिंदखेडा राजाचे आमदार शशिकांत खेडेकर यांनीही आपल्या आमदारपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला आहे. मात्र, अजूनही उद्धव ठाकरे यांनी यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा