माहीची स्टोरी प्रेक्षकांना आवडेल,कारण…

September 27, 2016 8:07 PM0 commentsViews:

भारतीय वन-डे आणि टी-20 क्रिकेट संघांचा कर्णधार एम्.एस्.धोणीच्या जीवनावर आधारीत चित्रपट ‘ MS Dhoni : The Untold Story ‘ हा 30 सप्टेंबरला जगभर रिलीज होणार आहे. यात सुशांतसिंग राजपुत धोणीच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट बॉक्सऑफिसवर टीकुन राहील, याची काही कारणे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आधी फुटबॉल आणि नंतर क्रिकेट असा प्रवास करत धोणी गावातील गल्ल्यांपासूनच जागतिक दर्जाचा यशस्वी कर्णधार बनला. त्यामुळेच चित्रपटात सक्सेस स्टोरी आणि त्याच्या लव्ह लाईफसोबतच स्पोर्टस् आणि ऍक्शन पुरेपुर असणार आहे. त्याचे जबरदस्त फॅन फॉलोईंग असल्यामुळे त्याचा फायदा या चित्रपटाला होऊ शकेल. कारण,त्याला सोशल साईट्सवर 8 करोडा इतके फॅन फॉलोव्हर आहे. भारतात तर बॉलिवूड आणि क्रिकेटची झिंग सगळ्यांच्या डोक्यावर चढलेली असते. धोणी तर काय वर्ल्ड चॅम्पियन आहे.

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खेळावर आत्तापर्यंत बनलेले चित्रपट. आपल्याकडे खेळावर आधारीत मोजकेच चित्रपट बनले असले तरीही त्यांनी भरपूर कमाई केली आहे. उदा.पान सिंग तोमर,भाग मिल्खा भाग,मेरी कॉम,चक दे इंडिया.

या चित्रपटाचे प्रमोशनदेखील जबरदस्त सुरू आहे. रिकाम्या शेड्युलमुळे का होईना या चित्रपटाच्या प्रमोशन्समध्ये स्वत: धोणीसुद्धा सक्रीय सहभाग घेत आहे. चित्रपटाला लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी धोणी स्वत: देशभरात आणि परदेशातसुद्धा सुशांतसिंग सोबत दौरे करत आहे. चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक नीरज पांडे हा त्याच्या ‘अ वेनस्डे’ आणि इतर चित्रपटांसाठी लोकप्रिय आहेतच सोबतच सुशांतसिंग राजपुतही छोट्या पडद्यापासूनच सगळ्यांच्या पसंतीची पावती घेऊन आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा