धुळ्यात आज ‘#एकमराठालाखमराठा’चा एल्गार

September 28, 2016 8:42 AM0 commentsViews:

nagar_maratha

धुळे – 27 सप्टेंबर :  धुळ्यात आज (बुधवारी) मराठा क्रांती मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. संपूर्ण राज्यभरात गेल्या महिन्याभरापासून प्रत्येक जिल्ह्यात मराठा क्रांती मूक मोर्चा काढून कोपर्डीत झालेल्या घटनेचा निषेध केला जात आहे. त्यासोबतच यातील आरोपींना फाशीची मागणी, मराठा समाजाचे आरक्षण यासारख्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जाच आहे. विशेष म्हणजे या मोर्चासाठी संपूर्ण राज्यातील मराठा समाज एकवटला असून राजकीय नेतेही आपले वैर विसरून एकत्र आले आहेत. सांगलीत काल झालेल्या मोर्चाला सांगलीकरांनी तुफान प्रतिसाद दिला. यानंतर आज धुळ्यातही मोठी गर्दी जमण्याचा अंदाज आहे.

धुळ्यातील गिंदोडिया चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होऊन महानगरपालिकामार्गे शिवतीर्थ चौक असा मोर्चाचा मार्ग आहे. शिवतीर्थ चौक इथेच मोर्चाचा समारोप होईल. सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे.

या मोर्चासाठी धुळे शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसंच, बुधवारी मोर्चा असल्याने शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा-काॅलेजांना सुटी जाहीर केली आहे. तसंच धुळ्यातील मोर्चात कोणताही अनुचितप्रकार घडू नये, यासाठी मराठा बांधवांनी, अयोजकांनी कंबस कसली आहे. तसंच कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी अडीच हजार पोलिस तैनात करण्यात येणार आहेत.

दरम्यान, केंद्रीय संरक्षणमंत्री राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे देखील सहकुटुंब या मोर्चात सहभागी होणार आहेत. यापूर्वीही राज्यात निघालेल्या मोर्चांना लाखोंची गर्दी जमल्यामुळे याही मोर्चात हेच चित्र पहायला मिळेल असं दिसतंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा