मुंबईकरांना प्रतीक्षा मोनोरेलची

April 20, 2010 3:22 PM0 commentsViews:

शिल्पा गाड20 एप्रिलमुंबईकरच नव्हे तर सगळ्या देशाचे लक्ष मुंबईतील मोनोरेल प्रकल्पाकडे लागले आहे. मोनेरेल जरी नोव्हेंबरमध्ये सुरू असली तरी तिचे डबे मुंबईत अवतरणार आहेत, येत्या ऑगस्टमध्ये. मूळची मलेशियाची संकल्पना असलेली ही मोनेरेल मुंबईत धावायला सुरुवात झाल्यावर आपला प्रवास सुसह्य होईल, अशी आशा मुंबईकरांना वाटत आहे. नोव्हेंबर 2010 पर्यंत या मोनोरेलचा पहिला टप्पा पूर्ण होईल.मलेशियातील मोनोरेलच्या धर्तीवर जरी येथील प्रकल्प हाती घेण्यात येत असला तरी, मुंबईतील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन मोनोरेलच्या डब्यांच्या रचनेत बदल करण्यात आले आहेत.सिटींगची संख्या कमी करून स्टँडिंगसाठी जागा वाढवण्यात आल्या आहेत. मुंबईच्या हवामानात टिकाव धरणारे मटेरिअल या मोनोरेलसाठी वापरण्यात आले आहे. या मोनोरेलचे भाडे पहिल्या तीन किलोमीटरसाठी एक दर आणि पुढील प्रतीकिलोमीटरनुसार वेगळा दर असे असेल. उपनगरी प्रवासासाठी एकच पास किंवा भाडे आकारण्याचा विचार आहे.

close