‘सामना’तील वादग्रस्त व्यंगचित्राच्या वाद आता मातोश्रीवर

September 28, 2016 1:49 PM0 commentsViews:

sHIVSENA213

28 सप्टेंबर : सामनातील वादग्रस्त व्यंगचित्राचा वाद आता मातोश्रीवर पोहोचला आहे. बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय रायमूलकर आणि डॉ. शशिकांत खेडेकर आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. व्यंगचित्र प्रकरणावरुन जनतेचा रोष उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचावा, यासाठी तिघांनी आपले राजीनामे पाठवल्याचं काल वृत्त फिरत होतं. मात्र  या वृत्तामध्ये काहीही तथ्य नसून शिवसेनेच्या कोणत्याही लोकप्रतिनिधीने राजीनामा दिलेला नाही, असं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार अनिल देसाई यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या भेटीमागे काय दडलंय काय. राजीनामा देऊ नका असा इशारा देण्यात आला की दिलेले राजीनामे परत घ्या, हे सांगण्यात येतं का, हे पहावं लागेल.

दरम्यान, शिवसेनेच्या ‘सामना’ मुखपत्रात मराठा क्रांती मोर्चाबाबत प्रसिद्ध झालेल्या व्यंग्यचित्राचे जोरदार राजकीय पडसाद उमटले. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. व्यंग्यचित्राबद्दल शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी माफी मागावी, अशी मागणी होत आहे. मात्र, उद्धव ठाकरे माफी मागणार नाहीत, असं काल (मंगळवारी) शिवसेनेने जाहीर केलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा