कॉड्रोस शिष्टमंडळांस आश्वासन देण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार

October 16, 2008 3:55 PM0 commentsViews: 6

16 ऑक्टोंबर, मुंबईविविध मागण्यांसाठी शरद राव यांच्या नेतृत्वाखाली रिक्षाआणि टॅक्सी चालकांनी संप पुकारला होता. 25 वर्षांपूर्वीच्या टॅक्सी बदलण्याच्या आदेशाला विरोध करण्यासाठी टॅक्सीचालक संपावर गेले. यानिमित्तानं टॅक्सी आणि रिक्षांच्या दोन युनियनमधला वाद समोर आला. यासंदर्भात दुसर्‍या युनियनचे नेते कॉड्रोस यांच्या नेतृत्वाखालील टॅक्सी युनियन शिष्टमंडळांची मुख्यमंत्र्यांशी भेट घेतली. पण कोणतंही आश्वासन देण्यास मुख्यमंत्र्यांनी नकार दिला तर शरद राव यांनी आज उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांची भेट घेतली. या भेटीबाबत राव म्हणाले, हा संप केवळ चोवीस तासांचा होता. आमची उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्याशी आमच्या मागण्यांबद्दल समाधानकारक चर्चा झाली असून या मागण्यांवर गंभीरतेने विचार करण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिलं आहे '. आज रात्री 12 वाजेपासून टॅक्सी आणि रिक्षासेवा सुरळीत सुरु होईल, असंही ते म्हणाले.

close