भारतापाठोपाठ भूतान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचाही ‘सार्क’वर बहिष्कार

September 28, 2016 11:28 AM0 commentsViews:
1-elections_092816120002
28 सप्टेंबर : इस्लामाबादमध्ये नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ‘सार्क‘ परिषदेत भारतापाठोपाठ भूतान, बांगलादेश आणि अफगाणिस्ताननेही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
 
उरीतील झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटं पाडण्याच्या भारताच्या प्रयत्नांना यश येऊ लागलं आहे. इस्लामाबादमधल्या सार्क परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार नाहीत,’ असं परराष्ट्र मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आलं. भारतानं आपला निर्णय काल जाहीर केला. त्यानंतर बांगलादेश, अफगाणिस्तान आणि भूताननेही जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ही परिषद रद्द करण्याची नामुष्की पाकिस्तानवर येणार आहे. 
दरम्यान, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या व्यासपीठावरून पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणांवर कडाडून हल्ला केला होता. सिंधू पाणीवाटप करारातील तरतुदीही भारतीय प्रशासन आता तपासून पाहू लागले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानमध्ये होणाऱ्या ‘सार्क’च्या परिषदेवर प्रश्‍नचिन्ह होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा