आरक्षणानंतर प्रश्न सुटणार आहे का ? हे पवारांनी स्पष्ट करावे-आढाव

September 28, 2016 5:39 PM0 commentsViews:

28 सप्टेंबर : आरक्षण दिल्यानंतर प्रश्न सुटणार आहे का दिशाभूल होणार आहे याचं स्पष्ट उत्तर शरद पवार यांनी दिलं पाहिजे असं आवाहन ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी केलंय. तसंच मराठा आरक्षण आणि ऍट्रोसिटी यावर तावातावाने बोलणारे मुख्यमंत्री शेतमालाला हमीभाव आणि कर्जमाफी या मुद्द्यांवर गप्प का असा सवालही आढाव यांनी विचारलाय.baba_Adham_on_pawar

 

येत्या 2 ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंती पासून पुण्यात शेतीच्या प्रश्नांवर सरकारला जागे करण्यासाठी बाबा आढाव 7 दिवस उपोषणाला बसणार आहेत. राज्य हमाल मापाडी महामंडळातर्फे राज्यव्यापी आंदोलन करूनही दखल न घेतल्याने उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि रघुनाथ पाटील यांनीही आढाव यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा