अशी तयार झाली शेंगा चटणी !, नसले बंधूंची यशोगाथा

September 28, 2016 6:09 PM0 commentsViews:

सागर सुरवसे, सोलापूर 28 सप्टेंबर : सोलापूर म्हटलं की जिभेवर चव रेंगाळते ती शेंगा चटणी आणि वाळलेल्या भाकरीची…अनेक वर्षांपासून सोलापूरच्या घराघरात बनवली जाते. मात्र या चटणीला राज्य आणि देशभरात पोहोचवण्याचं काम केलंय ते नसले बंधूंनी…आज या चटणीची ख्याती सातासमुद्रापार पोहोचलीय.

नसले शेंगा चटणीचा हा अस्सल सोलापुरी ब्रँड.. एकदा खालं तर पुन्हा मागाल असं म्हणत बोटं चाटायला लावणारी अशी शेंगा चटणी.. अमर नसले यांनी सोलापुरात घराघरात तयार होणा•या या चटणीला नवी ओळख दिलीय. वयाच्या बाराव्या वर्षापासून अमर यांनी या चटणीकडे उद्योगाच्या नजरेनं पाहिलं आणि ही चटणी आता सोलापूरची ओळख बनली.nasle

अमर नसले यांनी सायकलवर आपल्या चटणीच्या उद्योगाला सुरुवात केली. पहिल्यांदा ते लोकांच्या घरी जावून चटणी विकत होते. मात्र आता लोकं पुणे-सोलापूर महामार्गावर असलेल्या कोंडी इथल्या त्यांच्या दुकानात येऊन चटणी खरेदी करतात.

वडलांनी सुरू केलेल्या या छोट्याशा व्यवसायाला अमर आणि त्यांच्या पत्नी अंजली यांनी आकार दिला. केवळ नफा मिळवणे हा उद्देश न ठेवता ग्रामीण भागातल्या स्त्रीयांना रोजगारासोबतच प्रतिष्ठाही प्राप्त करुन दिली. आज अनेक महिला त्यांच्या या उद्योगात काम करतात.

जेमतेम दहावीपर्यंतचं शिक्षण घेतलेल्या अमर नसले यांनी सोलापूरच्या शेंगाचटणीला देश-विदेशात पोहोचवलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा