वकिलांच्या असभ्य वर्तनाची दखल

April 20, 2010 3:33 PM0 commentsViews: 3

20 एप्रिल

नागपुरातील वकिलांच्या असभ्य वर्तनाची दखल हायकोर्टाने घेतली आहे. हायकोर्ट बार असोशिएशनच्या निवडणुकीत उमेदवारांची निवड झाल्यानंतर विजयी उमेदवारांनी कोर्टाच्या आवारातच जल्लोष केला होता.

अनिल मार्डीकर अध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर कोर्टाच्या आवारात फटाके फोडण्यात आले, गुलाल उडवण्यात आला. काहींनी तर शॅम्पेन फोडून आनंद साजरा केला होता.

एरवी कायद्याची भाषा करणार्‍या वकिलांनीच आनंदाच्या भरात कोर्टाच्या परिसरात कायद्याचा भंग केला. या प्रकरणाची दखल घेत हायकोर्टाने चौकशीचे आदेश दिले.

close