सेना आणि मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठी हा विनाकारण वाद -राऊत

September 28, 2016 8:10 PM0 commentsViews:

28 सप्टेंबर : व्यंगचित्रावर कार्टूनिस्ट प्रभूदेसाई यांनी माफी मागितली आहे. त्यामुळे या वादावर आता पडदा पडलाय असं सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी म्हटलंय. तसंच शिवसेनेला आणि मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठी अकारण वाद निर्माण केले जात असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केलाय.

sanjay_raut_on_bjpव्यंगचित्र वादावर पहिल्यांदाच संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. मराठा मोर्चे हे काँग्रेसच्या विरोधात आहे. त्यामुळे त्यांचं पोटदुखत आहे. मुख्यमंत्र्यांचं काम नेटाने सुरू आहे. पण त्यांना अडचणीत आणण्यासाठी काही जण प्रयत्न करत आहे. आता त्यांच्या भोवती कोण कार्टून फिरत आहे हे सगळ्यांना माहित आहे असा टोला राऊत यांनी आशिष शेलार यांचं नाव न घेता लगावला.

तसंच सामनाच्या कार्यालयावर हल्ले झाले ही त्यांची भावना आहे. पण एकदा दगड मारून पळून जाणे याला हल्ला म्हणत नाही. हल्ले कसे करायचे याचं ट्रेनिंग आमच्याकडून घ्या असा टोलाही त्यांनी संभाजी ब्रिगेडला लगावला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा