राज्यभरात मराठा समाजातील व्यक्तींविरोधात अॅट्रॉसिटीचे 46 गुन्हे दाखल

September 28, 2016 8:45 PM0 commentsViews:

maratha_samaj28 सप्टेंबर : ऍट्रॉसिटी कायद्या बदल करण्यात यावा या मागणीसाठी राज्यभरात मराठा समाजाचे मूक मोर्चे निघत आहे. मात्र मोर्चे सुरू झाल्यापासून राज्यात मराठा समाजातील व्यक्तींवर 46 ऍट्रासिटी गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.

कोपर्डी प्रकरणानंतर नराधमाला फाशीची शिक्षा मिळावी आणि ऍट्रॉसिटी कायद्यात बदल करावा या मागणीसाठी राज्यभरात लाखोंच्या संख्येनं मोर्च निघत आहे. 9 ऑगस्टला औरंगाबादमधून मोर्च्याला सुरुवात झालीये. बघताबघता अवघ्या महाराष्ट्रभर मराठा समाजाचे विराट मूक मोर्चे निघत आहे. मात्र, ज्या मागण्यासाठी हे मोर्चे निघत आहे त्यासाठीच मराठा समाजावर राज्यभरात 46 गुन्हे दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. वेगवेगळ्या प्रकरणामध्ये 40 गुन्हे मराठा समाजातल्या व्यक्तींविरोधात दाखल झाले आहे. 6 गुन्हे हे कुणबी समाजातल्या व्यक्तींविरोधात दाखल झाले आहे. तर 10 गुन्हे हे इतर समाजातील व्यक्तींवर दाखल झाले आहे. या सर्व प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे. ही प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे हे गुन्हे कशामुळे आणि कुठे दाखल झाली याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा