नागपुरात मणप्पुरम गोल्डच्या शाखेवर धाडसी दरोडा, 30 ते 40 किलो सोनं लुटलं

September 28, 2016 9:05 PM0 commentsViews:

manpuram_goldनागपूर, 29 सप्टेंबर : नागपुरात मणप्पुरम गोल्ड लोनच्या शाखेवर धाडसी दरोडा पडलाय. दरोडेखोरांनी तब्बल 30 ते 40 किलो सोन्याची लूट केल्याची माहिती मिळतीये. या सोन्याची किंमत 8 ते 9 कोटी असल्याचा अंदाज आहे.

सोनं तारण ठेवून कर्ज देणाऱ्या मणप्पुरम गोल्ड लोन कंपनी अल्पवधीत लोकप्रिय झाली. सोनं तारण ठेवून लोकं व्याजाने पैसे घेतात. नागपुरातल्या भीमचौकात मणप्पुरम गोल्डची शाखा आहे. या शाखेवर आज दुपारी संशस्त्र दरोडा टाकण्यात आलाय. 5 ते 6 सशस्त्र दरोडेखोरांनी ही लूट केलीये. या दरोडेखोरांनी तब्बल 30 ते 40 किलो सोनं लुटलंय. या सोन्याची किंमत 8 ते 9 कोटींच्या घरात आहे. दरोडेखोरांनी 3 लाखांची रोकडही लंपास केलीये. दिवसाढवळ्या झालेल्या दरोड्यानं नागपुरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा