सातार्‍यात दरोडेखोरांना अटक

April 20, 2010 3:41 PM0 commentsViews: 6

20 एप्रिल

दरोड्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात दरोडेखोरांतील दोघांना सातारा पोलिसांनी जेरबंद केले आहे. मात्र या टोळीचा म्होरक्या कुख्यात गुंड राजेंद्र बाबर आणि त्याचे तीन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. रात्रीच्या वेळी संशयीतरित्या उभी असलेली ईस्टीम गाडी पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. पण ही गाडी कोरेगावच्या दिशेने भरधावपणे निघून गेली.

वाठार-स्टेशन मार्गावर कोरेगाव विभागीय पोलिस उपाधिक्षक विठ्ठल हरीहर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ही गाडी अडवली. यावेळी झटापट करून पोलिसांनी गाडीतील दरोडेखोरांना पकडले.

त्यांच्याकडून बनावट बंदूक, तलवार, गुप्ती, काठ्या आदी हत्यारे हस्तगत करण्यात आली.

close