कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन

September 29, 2016 12:22 PM0 commentsViews:
pakistan ceasefire voilation
29 सप्टेंबर :  उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात आज (गुरुवारी) सकाळी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.
 
पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने शस्त्रसंधीचा भंग केल्यानंतर आता कुपवाडा जिल्ह्यातील चौक्यांवर गोळीबार करम्यात आला आहे. कुपवाडा जिल्ह्यातील नौगाम सेक्टरमधील दानेश आणि लक्ष्मी पोस्टवर गोळीबार करण्यात आला. भारतीय जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. 
 
पाकिस्तानच्या सैनिकांनी बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमाराला नियंत्रण रेषेवरील भारतीय ठाण्यावर सुरवातीला लहान शस्त्रांतून अंधाधुंद गोळीबार केला होता. त्यानंतर उखळी तोफांद्वारे हल्ला केल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, पाकनं असा दावा केलाय की त्यांचे 2 सैनिक या गोळीबारात शहीद झाले आहे. नेहमी जे शस्त्रसंधीचं उल्लंघन होतं, त्यापेक्षा हे जास्त प्रमाणावर आहे. याबाबतच पंतप्रधानांनी आज सकाळी कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक घेतली. आज दुपारी संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालयाची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. कालच संरक्षणमंत्र्यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांची बैठक घेतली होती. त्यामध्ये त्यांनी पाकच्या आगळिकीला सडेतोड उत्तर देण्याचे आदेश दिले होते. दुसरीकडे नवाज शरीफ आणि पाकचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांच्यातही आज बैठक झाली..


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा