शहीदांसाठी आयोजित कार्यक्रमात गायकावर कोट्यावधी रुपयांची उधळण

September 30, 2016 9:16 AM0 commentsViews:

 

गुजरात – 30 सप्टेंबर :  उरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गुजरातमधील सुरत शहरात एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमादरम्यान, गायक कीर्तीदान गढवी यांच्यावर तब्बल 1 कोटी रुपयांची उधळण करण्यात आली. मात्र या कार्यक्रमात जमा झालेली रक्कम शहीद जवानांच्या नातेवाईकांना देण्यात येणार असं या कार्यक्रमाच्या आयोजकांचं म्हणण आहे.

Surat money

सुरतचे व्यापारी महेश सवाणीने उरी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबीयांसाठी ‘वतन के रखवाले’ हा भजन कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम सुरू असताना तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी पैसे उडवण्यास सुरुवात केली. एक दोन लाख नव्हे तर तब्बल एक कोटीहून अधिक रुपयांचा  लोकांनी अक्षरश: पाऊस पडला.

दरम्यान, जमा झालेले सर्व पैसे शहीद जवानांच्या नातेवाईकांना मदत म्हणून दिले जाणार आहेत, असं अयोजकांचं म्हणण आहे. मात्र असे एखाद्यावर उधळलेले पैसे शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना देणं हे कितपत योग्य आहे याचा किमान विचार या आयोजकांनी करायला हवा होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा