पुढील रणनीती ठरवण्यासाठी मोदींनी पुन्हा बोलावली बैठक

September 30, 2016 11:42 AM0 commentsViews:

mODI MEET213

30 सप्टेंबर :  पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैन्यानं केलेल्या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवारी) मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवरील सुरक्षेचा आढावा घेतला जाणार  आहे. त्याचबरोबर पाकनं काही आगळीक केल्यास कसं उत्तर द्यायचं याची रणनीतीही ठरवली जाण्याची शक्यता आहे.

भारतानं वर्मावर घाव घातल्यामुळं पाकिस्तान सैरभैर झाला आहे. अशा स्थितीत पाकिस्तनी सैन्य दहशतवाद्यांना आणखी चिथावणी देण्याची शक्यता आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताचं पाऊल काय असावं, यावरही बैठकीत मंथन होणार आहे. दुसरीकडं, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही देशांतर्गत सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, इंडो-तिबेटी बॉर्डर पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार असून सीमेवरील सुरक्षेबाबत चर्चा करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा