आयपीएलमागे ससेमिरा

April 21, 2010 11:42 AM0 commentsViews: 3

21 एप्रिल

आयपीएलच्या मागे आयकर विभागाचा चांगलाच ससेमिरा लागला आहे. आयपीएलशी संबिधीत एजन्सीजवर आज आयकर विभागाने छापे टाकले.

आयएमजी, वर्ल्ड स्पोर्ट्स ग्रुप मल्टी स्क्रीन मीडिया या एजन्सीजवर छापे टाकण्यात आलेत.

आयपीएलचा वाद सुरू झाल्यानंतर, आयकर विभागाने हे धाड सत्र सुरू केले. यात प्रत्येक टीमचीही चौकशीही होणार आहे.

दरम्यान वर्ल्ड स्पोर्टस् कंपनीच्या ऑफिसमधील सर्च ऑपरेशन आयकर अधिकार्‍यांनी पूर्ण केले आहे. हे पथक वर्ल्ड स्पोर्टस् ग्रुपचे इंडिया प्रमुख विनू नायर यांच्या अंधेरी येथील घराचे सर्च ऑपरेशन करणार आहेत.

आयपीएलशी संबंधित या एजन्सी काय करतात हे पाहूयात…

मुंबईत पहिल्यांदाच इन्कमटॅक्स डिपार्टमेंटने मल्टीस्क्रिन मीडिया आणि वर्ल्ड स्पोर्ट्स ग्रुपच्या कार्यालयावर छापे घातले

मल्टीस्क्रिन मीडिया आणि वर्ल्ड स्पोर्ट्स ग्रुप हे आयपीएलच्या प्रसारणाचे काम पाहतात

सूत्रांच्या माहितीनुसार मोदींच्या घरावरसुद्धा इन्कमटॅक्स डिपार्टमेंटचे छापे पडू शकतात

बीसीसीआयने मोदींना 10 प्रश्न विचारले आहेत. हे प्रश्न बीसीसीआयला इन्कमटॅक्स डिपार्टमेंटने विचारले होते

मोदींभोवती फास

मोदींविरुद्ध आता फास आवळायला सुरूवात झाली आहे. घडामोडी लक्षात घेता मोदींना आता पायउतार व्हावे लागेल.

बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर हे आयपीएलचे नवे कमिशनर असतील. बीसीसीआयच्या चौकशी समितीचे नेतृत्व अरूण जेटली करू शकतात.

मोदी चौकशीत निर्दोष सिद्ध झाले तर त्यांना आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलमध्ये आणले जाऊ शकते. काही नवीन सदस्यही गव्हर्निंग कौन्सिलमध्ये आणले जातील.

एखादा प्रोफेशनल सीईओ आयपीएलचे प्रशासकीय कामे करण्यासाठी नेमला जाऊ शकतो.

पंतप्रधानांनी घातले लक्ष

आयपीएलच्या वादात आता पंतप्रधानांनी लक्ष घातले आहे. पंतप्रधानांनी आज बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्लांची भेट घेतली. या भेटीत आयपीएलच्या वादावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

तसेच या प्रकरणाची पूर्ण माहिती पंतप्रधानांनी मागितली आहे. यावेळी पंतप्रधानांनी मोदी प्रकरणावरही चर्चा केल्याचे समजते.

कोलकाता नाईट रायडर्सवर छापा

इन्कम टॅक्स विभागाने कोलकाता नाईट रायडर्सच्या ऑफीसवरही छापा टाकला आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचे ऑफीस क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या इमारतीत आहे.

मॉरिशसमधील कंपनीचे शाहरुखच्या कोलकाता टीममध्ये शेअर्स असल्याचे बोलले जाते.

आयटी विभागाने किंग्ज एलेव्हन पंजाबच्या प्रमोटर्सनाही समन्स बजावलीत. राजस्थान रॉयल्सही आयटीच्या रडारवर आहे.

close