गोळीबाराच्या शक्यतेमुळे सीमेलगतची गावं खाली करण्याचे आदेश

September 30, 2016 3:23 PM0 commentsViews:

30 सप्टेंबर : भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल ऑपरेशननंतर पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोळीबार होण्याच्या शक्यतेमुळे पंजाब आणि काश्मीरमध्ये सीमेलगतच्या गावांना खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Migration

भारतातील पंजाबमध्ये तर सीमेपासून 10 किलोमीटरपर्यंत गावं रिकामी करण्यात येत आहेत. यामध्ये गावातील सुमारे दोन लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. प्रशासनाकडून 15 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी व्यवस्था करण्यात आली आहे. मोठ्या अडचणीत घर सोडावं लागत असलं तरी या लोकांची काहीही तक्रार नाही.

सध्याच्या परिस्थितीत आमच्यावर जीवाला धोका असल्यामुळे खबरदारी म्हणून आम्हाला जायला सांगत असतील आहे. पण त्याला आमची काहीच हरकत नाही, अशा भावना या नागरिकांनी व्यक्त केली आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा