मोदींचा बंडाचा झेंडा

April 21, 2010 12:12 PM0 commentsViews: 1

21 एप्रिल

अखेर आयपीएलचे कमिशनर ललित मोदी यांनी बीसीसीआयविरुद्ध बंडाचा झेंडा फडकावला आहे.

गव्हर्निंग कौन्सिलची बैठक पुढे ढकलावी, असे त्यांनी थेट बीसीसीआयला सांगून टाकले आहे.

26 तारखेला होणार्‍या आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीला उपस्थित राहण्याची मोदी यांची तयारी नाही. पण बैठक रद्द करणार नाही असे बीसीसीआयने मोदींना ठणकावले आहे.

मोदी या बैठकीला उपस्थित नसले तरी त्यांच्याविरोधात मतदान करण्याची तयारी बीसीसीआयने केल्याचे समजते.

गव्हर्निंग कौन्सिलची मिटींग बोलावण्याचा अधिकार आपलाच आहे, असा दावाही मोदींनी केला आहे.

तसा मेलच मोदींनी गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्यांना पाठवला आहे. बीसीसीआयने अशा प्रकारवे बैठक बोलावणे हे अवैध असल्याचे मोदींनी त्यात म्हटले आहे.

ई-मेलमध्ये त्यांनी शशांक मनोहर आणि जेटली यांच्यावरही आरोप केले आहेत.

ललित मोदींनी 14 एप्रिल 2010 रोजी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्यांना मेल केला होता.

त्यात मोदी म्हणतात…

आयपीएलमधला कारभार पारदर्शी राहण्यासाठी आपल्याला सर्व फ्रँचाईजच्या संचालकांची नावे पुन्हा एकदा जाहीर करायला हवीत.

यापूर्वी आपण लिलावाच्या वेळी फ्रँचाईजची नावे आणि त्यांचे शेअर्स जाहीर केले होते. यामुळे आयपीएलच्या फ्रँचाईजीबद्दल सुरू असलेल्या सर्व शंकांना उत्तर मिळेल.

मला आशा आहे, आपण सर्वजण माझ्या विचारांशी सहमत असाल.

यावर शशांक मनोहर यांनी मोदींना 15 तारखेला उत्तर दिले.

हा मुद्दा गुंतागुंतीचा आहे. आणि त्यावर सखोल चर्चा व्हायला हवी, असे त्यांनी म्हटले.

close