सीमेवर दक्ष राहा, राजनाथ सिंहांची जवानांना सूचना

September 30, 2016 9:30 PM0 commentsViews:

rajnatha_singh_meetingदिल्ली, 30 सप्टेंबर : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज भारत-पाकिस्तान सीमेवरच्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. सीमेवर सुरक्षा दलांनी दक्ष राहावं असे आदेश राजनाथ सिंह यांनी जवानांना दिले.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैन्यानं केलेल्या सर्जिकल ऑपरेशननंतर दोन्ही देशांमधला तणाव आणखी वाढलाय, पाकिस्तान भारतात पुन्हा दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रयत्न करू शकतो, त्या पार्श्वभूमीवर सरकार सर्व ती खबरदारी घेत आहे. राजनाथ सिंह यांनी सुरक्षा दलांची उच्च स्तरीय बैठक घेतली. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, केंद्रीय गृहसचिव राजीव मेहरिषी तसंच सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सीमेवर सुरक्षा दलांनी दक्ष राहावं अशी सूचना राजनाथ सिंह यांनी दिली. पाकिस्ताननं कोणतीही आगळीक केल्यास ती हाणून पाडण्यासाठी कोणते खबरदारीचे उपाय करण्यात आले आहेत याची माहिती सीमा सुरक्षा दलानं गृहमंत्र्यांना दिली. त्याशिवाय सीमेलगत आणि नियंत्रण रेषेलगतच्या गावांमधल्या गावक•यांच्या सुरक्षेवरही चर्चा करण्यात आली. जम्मू, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमध्ये सीमाभागात गस्त वाढवण्यात आली आहे. तसंच राखीव जवानांनाही तैनात करण्यात आलंय. तसंच नागरिकांना सीमाभागात जाण्यास मनाई करण्यात आलेत. सीमेलगतच्या गावांमधून गावक•यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी सुरक्षा दलांनी स्थानिक प्रशासनाला मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा