मोदींची हे सडेतोड कृती, राहुल गांधींची मोदींवर स्तुतीसुमनं

September 30, 2016 9:52 PM0 commentsViews:

rahul gandhi_modi30 सप्टेंबर : पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं केलेल्या सर्जिकल कारवाईनंतर देशातले सर्व राजकीय पक्ष मतभेद बाजूला ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभे राहिल्याचं चित्र आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधानासारखे वागले आहेत, अशी प्रशंसा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलीये.

नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यातलं ‘शितयुद्ध’ जग जाहिर आहे. पण, सर्जिकल स्ट्राईकच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच नरेंद्र मोदींची स्तुती केलीये. गेल्या अडीच वर्षात पंतप्रधानांची ही पहिलीच सडेतोड कृती होती, अशी स्तुतीसुमनं राहुल गांधी यांनी उधळली. सध्या राहुल गांधी उत्तर प्रदेशच्या दौ•यावर आहेत. या दौ•यात त्यांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलंय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुसरे कट्टर राजकीय विरोधक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही नरेंद्र मोदींची प्रशंसा केलीये. दिल्लीच्या विधानसभेनं आज एक ठराव मंजूर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंग सुहाग यांचं अभिनंदन केलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा